I think a lot...sometimes something useful......sometimes directionless traffic. Felt like expressing all this. So here I am...

Saturday, March 31, 2007

निसर्ग आणि उदासिनता

निसर्ग आणि उदासिनता - ऐकल्या बरोबर कसे विरोधाभासी शब्द वाटतात ना? आणि ते खरेही आहे. निसर्गाच्या सानिध्यात रमणार्या माझ्यासारख्या कुणाला विचारा. निसर्ग म्हणजे आनंद, प्रफुल्लितता. त्यात ही मला झाडे, डोंगर, नद्या यांच्या सहवासात एक वेगळाच आनंद वाटतो.

पण कधी निसर्गाच्या सनिध्यात असताना एका ठिकाणी बसून, फक्त आजूबाजूला न्याहाळत, सभोवतालची शांतता अनुभवली आहे? त्या वेळेला शांतते सोबतच एक विचित्रशी उदासिनता कधी कधी मनात भरून राहते. एकाच वेळी मन आनंदित आणि उदासिन होते. हा अनुभव तुम्हाला कधी आलाय का?

कशाची असते ही उदासिनता? निसर्गासमोर आपण किती छोटे आहोत या जाणीवेची असते कि माणसांच्या गर्दितही प्रत्येक जण किती एकटा आहे हा विचार रुख रुख लावून जातो?

No comments: